हा त्रास काय आहे?
मेनिस्कस ही गुडघ्यातील दोन हाडांमधील C आकाराची 'गादी' आहे. तरुणांमध्ये खेळताना गुडघा वळल्याने ती फाटू शकते, तर वयानुसार ती झिजते. फाटण्याचा प्रकार व आकार MRI वरून ठरवून उपचारांचे नियोजन केले जाते.
सामान्य लक्षणे
- गुडघ्याच्या आतील किंवा बाहेरील बाजूला वेदना
- गुडघा अडकणे किंवा लॉक होणे
- वळताना कळ येणे
- हळूहळू वाढणारी सूज
सामान्य कारणे
- खेळताना गुडघा वळणे
- उकिडवे बसून अचानक उठणे
- वयानुसार झीज
- वाढलेले वजन
आमच्याकडील उपचार
तपासणीनंतर डॉक्टर यांपैकी आपल्या गरजेनुसार उपचार निवडतात.
- 3RDT रिजनरेशन थेरपीरिजनरेशन थेरपीच्या संकल्पनेवर आधारित आमची विशेष उपचार प्रणाली. सांध्यांची स्थिती, आजाराची तीव्रता आणि वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे नियोजन.
- जानुबस्तीगुडघ्याभोवती पिठाचे कुंपण करून त्यात कोमट औषधी तेल ठराविक वेळ धरून ठेवण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
- लेप व उपनाहवनस्पतींचा औषधी लेप किंवा पोटीस बांधणे.
- स्नेहन व स्वेदनऔषधी तेलाने अभ्यंग आणि त्यानंतर नियंत्रित उष्णतेने वनस्पतींची वाफ.
- औषधोपचारमेरुपोषक व मज्जास्नायू पोषक आयुर्वेदिक औषधे; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.
- पथ्य, व्यायाम व योगआहार, दिनचर्या, व्यायाम आणि योगासनांविषयी वैयक्तिक मार्गदर्शन.
उपयुक्त तपासण्या: गुडघ्याचा MRI
ही लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
- गुडघा पूर्णपणे लॉक होऊन सरळ न होणे
- दुखापतीनंतर पायावर भार देता न येणे
रोजची काळजी
- उकिडवे बसणे व मांडी घालणे टाळा
- वळणाचे खेळ काही काळ टाळा
- मांडीचे स्नायू बळकट करा
ही माहिती जनजागृतीसाठी आहे; ती डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीला पर्याय नाही.