कलाप्रसाद ऑर्थो–न्यूरो स्पाइन आयुर्वेद हॉस्पिटल, कोल्हापूर
गुडघा आणि मणक्याच्या त्रासावर शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचार
आजाराचे स्वरूप, प्रकृती, वय आणि वैद्यकीय तपासण्या पाहून प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचार नियोजन. कोल्हापुरात प्रत्यक्ष भेट, किंवा भारतात कुठूनही व्हिडिओ व फोनवर सल्ला.
BAMS, आयुर्वेद सल्लागार संस्थापक, कलाप्रसाद ऑर्थो–न्यूरो स्पाइन आयुर्वेद हॉस्पिटल
१२+वर्षांची रुग्णसेवा
१५,०००+गुडघ्याच्या त्रासाचे रुग्ण
२५,०००+मणक्याच्या त्रासाचे रुग्ण
डॉ. विनायक शिंदे हे BAMS पदवीधर आयुर्वेद सल्लागार असून कलाप्रसाद ऑर्थो–न्यूरो स्पाइन आयुर्वेद हॉस्पिटलचे संस्थापक आहेत. अस्थी, सांधे, मणके व नसांच्या विकारांवर ते गेली १२ वर्षे कोल्हापुरात उपचार करत आहेत. आयुर्वेदाचे पारंपरिक ज्ञान, आधुनिक निदानाची समज आणि प्रत्येक रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन उपचार ठरवणे हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. रुग्णाला आजार समजावून सांगणे आणि उपचारांचे पर्याय स्पष्टपणे मांडणे यावर त्यांचा भर असतो.
उपाध्यक्ष, कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन
कोविडनंतर अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस (AVN) चा विशेष अभ्यास
महाराष्ट्रभर आरोग्य शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग
पंढरपूर वारीत वारकऱ्यांसाठी नियमित मोफत आरोग्य तपासणी
नमस्कार, मी डॉ. विनायक विष्णूदेव शिंदे. मागील १२ वर्षांपासून कोल्हापूर शहरात रुग्णांना आयुर्वेदाची सेवा देत आहे. कलाप्रसाद ऑर्थो न्यूरो स्पाइन आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सेवा दिली आहे. कोविडनंतर AVN चा विशेष अभ्यास करून अनेक रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार केले आहेत.
रुग्णाची प्रकृती, वय, बल आणि आजाराचे स्वरूप पाहून डॉक्टर उपचार निवडतात. प्रत्येक रुग्णाला सर्व उपचारांची गरज नसते.
3RDT
गुडघ्याचा संधिवात व कूर्चेची झीज यासाठी
3RDT रिजनरेशन थेरपी
रिजनरेशन थेरपीच्या संकल्पनेवर आधारित आमची विशेष उपचार प्रणाली. गुडघ्याच्या सांध्याची स्थिती, आजाराची तीव्रता आणि X-ray/MRI च्या आधारे प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र नियोजन केले जाते. ही थेरपी आपल्यासाठी योग्य आहे का, हे तपासणीनंतर डॉक्टर सांगतात.
जानुबस्तीगुडघ्याभोवती पिठाचे कुंपण करून त्यात कोमट औषधी तेल ठराविक वेळ धरून ठेवण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
कटिबस्तीकंबरेच्या भागात औषधी तेल विशिष्ट वेळेसाठी धारण करण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
ग्रीवाबस्ती व पृष्ठबस्तीमान व पाठीच्या भागावर औषधी तेल धारण करण्याचा उपचार.
शास्त्रोक्त विशेष उपचार
प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखाली, योग्य रुग्णनिवडीनंतरच केले जातात.
अग्निकर्मआयुर्वेदातील विशिष्ट तंत्रानुसार, प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखाली निवडक वेदनाबिंदूंवर केली जाणारी उपचारपद्धती.
विद्धकर्मविशिष्ट बिंदूंवर बारीक सुईच्या साहाय्याने केला जाणारा शास्त्रोक्त उपचार.
रक्तमोक्षणशास्त्रोक्त रक्तमोक्षण; योग्य रुग्णनिवड आणि वैद्यकीय सुरक्षिततेचे निकष पाळूनच.
पंचकर्म व शरीर उपचार
पंचकर्मवमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे शोधन उपचार; प्रकृती, वय, बल आणि आजाराचे स्वरूप पाहून निवड.
बस्ती चिकित्साअनुवासन (तेल) व निरूह (काढा) बस्ती; वाताच्या विकारांमध्ये प्रमुख उपचार.
स्नेहन व स्वेदनऔषधी तेलाने अभ्यंग आणि त्यानंतर नियंत्रित उष्णतेने वनस्पतींची वाफ.
पत्र पोटलीऔषधी पानांची गरम पोटली दुखऱ्या भागावर फिरवून शेक.
नस्यनाकातून औषधी थेंब; मान व डोक्याशी संबंधित तक्रारींमध्ये उपयुक्त.
लेप व उपनाहवनस्पतींचा औषधी लेप किंवा पोटीस बांधणे.
शिरोधाराकपाळावर कोमट औषधी तेलाची संथ, सलग धार.
औषधे व जीवनशैली
औषधोपचारमेरुपोषक व मज्जास्नायू पोषक आयुर्वेदिक औषधे; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.
पथ्य, व्यायाम व योगआहार, दिनचर्या, व्यायाम आणि योगासनांविषयी वैयक्तिक मार्गदर्शन.
एका उपचारसत्रात काय होते?
प्रत्येक टप्प्याचे १० सेकंदांचे ॲनिमेशन पाहा.
टप्पा १ / ७
स्नेहन
किमान ४५ मिनिटे
कोमट औषधी तेल निवडले जाते
संपूर्ण शरीराला ठराविक दिशेने अभ्यंग
किमान ४५ मिनिटे
टप्पा २ / ७
स्वेदन: नाडीस्वेद
३० मिनिटे किंवा घाम येईपर्यंत
औषधी काढ्याची वाफ तयार केली जाते
नळीतून वाफ शरीरावर दिली जाते
३० मिनिटे किंवा घाम येईपर्यंत
टप्पा ३ / ७
स्वेदन: पत्र पोटली
स्वेदनाचा एक प्रकार
औषधी पानांची पोटली गरम केली जाते
दुखऱ्या भागावर लयीत शेक दिला जातो
षष्टिक शाली पिंडस्वेदही असाच केला जातो
टप्पा ४ / ७
अनुवासन बस्ती
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
औषधी तेलाची बस्ती
रुग्णाला डाव्या कुशीवर झोपवून दिली जाते
नंतर १५ मिनिटे विश्रांती व हलका आहार
टप्पा ५ / ७
निरूह बस्ती
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार
मध, सैंधव, तेल, कल्क व काढा यांचे मिश्रण
काढ्याची (क्वाथ) बस्ती दिली जाते
डॉक्टरांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली
टप्पा ६ / ७
लेप कर्म
५० मिनिटे
वनस्पतींचा ताजा औषधी लेप तयार केला जातो
दुखऱ्या भागावर जाड थर लावला जातो
सुमारे ५० मिनिटे ठेवला जातो
टप्पा ७ / ७
शिरोधारा
४५ मिनिटे
कपाळावर कोमट तेलाची संथ, सलग धार
धारापात्र हलक्या लयीत झोके घेते
सुमारे ४५ मिनिटे
एका व्यक्तीच्या संपूर्ण उपचारसत्राला किमान अडीच ते साडेतीन तास लागतात.
कोणते उपचार व कोणत्या क्रमाने, हे डॉक्टर प्रत्येक रुग्णासाठी ठरवतात. तेल नेहमी कोमट वापरले जाते.
भारतात कुठूनही सल्ला घ्या
कोल्हापूरला येणे शक्य नसेल तरी उपचार थांबवण्याची गरज नाही.
प्रत्यक्ष भेट व ॲडमिट उपचार
ओपीडी तपासणी, पंचकर्म आणि गरजेनुसार ॲडमिट करून उपचार. बस्ती उपचारांदरम्यान नर्सिंग स्टाफ रोजचा आहार, वेळ व शरीरक्रियांची नोंद ठेवतो.
2832, जवाहर नगर, कोल्हापूर, महाराष्ट्र ओपीडी: सकाळी १० ते सायंकाळी ७
व्हिडिओ सल्ला
WhatsApp व्हिडिओ कॉलवर डॉक्टरांशी थेट सल्ला. X-ray, MRI व रिपोर्ट्सचे फोटो आधी पाठवा.
फोन सल्ला
व्हिडिओ शक्य नसल्यास साध्या फोन कॉलवर सल्ला. ज्येष्ठ नागरिकांसाठी सोपा पर्याय.
ऑनलाइन उपचार कसे चालतात
१माहिती पाठवा
फॉर्म भरा किंवा WhatsApp करा; रिपोर्ट्सचे फोटो जोडा.
२वेळ निश्चित
आमची टीम आपल्याला सल्ल्याची वेळ कळवते.
३डॉक्टरांशी सल्ला
तपासणी, निदान आणि आपल्यासाठी उपचार योजना.
४औषधे घरपोच
औषधे व उपचार किट कुरियरने भारतात कुठेही.
५फॉलो-अप
ठराविक अंतराने प्रगतीचा आढावा व बदल.
औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दिली जातात. काही उपचारांसाठी (उदा. बस्ती, अग्निकर्म) प्रत्यक्ष भेट आवश्यक असू शकते; तसे डॉक्टर सांगतात.
उपचारांमागचा आमचा दृष्टिकोन
आजाराच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न
प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक उपचार नियोजन
शास्त्रशुद्ध आयुर्वेदिक उपचारपद्धती
आवश्यकतेनुसार आधुनिक निदान पद्धतींचा आधार
रुग्णांचे समुपदेशन व आरोग्य जनजागृती
जीवनशैली व व्यायामाविषयी मार्गदर्शन
शस्त्रक्रिया किंवा इतर तज्ज्ञांची गरज असल्यास तसे स्पष्ट सांगितले जाते.
पाहा आणि समजून घ्या
डॉक्टरांच्या आरोग्य जनजागृती मालिकेतील व्हिडिओ.
गुडघ्याची 'गादी' कशी झिजते?मराठीकलाप्रसाद हॉस्पिटलची ओळखमराठी
दवाखान्याबाहेरची रुग्णसेवा
कोल्हापूरपंढरपूर
पंढरपूर वारी आरोग्य शिबिर
आषाढी व कार्तिकी वारीत पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना गुडघे, पाय व कंबरदुखीचा मोठा त्रास होतो. डॉ. शिंदे दरवर्षी नियमितपणे वारीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांत सेवा देतात.
महाराष्ट्रभर आरोग्य शिबिरे
ग्रामीण व शहरी भागांतील अनेक आरोग्य शिबिरांत तपासणी व मार्गदर्शन.
वैद्यकीय समुदायात नेतृत्व
कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष.
आरोग्य जनजागृती
सोप्या भाषेत आरोग्यविषयक माहिती देणारी व्हिडिओ मालिका.
हे आजाराच्या टप्प्यावर अवलंबून असते. तपासणी आणि X-ray/MRI पाहून डॉक्टर उपलब्ध पर्याय समजावून सांगतात. शस्त्रक्रिया हाच योग्य पर्याय असल्यास तसे प्रामाणिकपणे सांगितले जाते.
कोल्हापूरला न येता उपचार घेता येतात का?
हो. व्हिडिओ किंवा फोनवर सल्ला घेता येतो आणि औषधे व उपचार किट भारतात कुठेही कुरियरने पाठवली जातात. काही उपचारांसाठी (उदा. बस्ती, अग्निकर्म) प्रत्यक्ष भेट आवश्यक असू शकते.
सल्ल्यासाठी कोणते रिपोर्ट्स आणावेत?
जुने X-ray, MRI, रक्त तपासण्या, सध्या घेत असलेल्या औषधांची यादी आणि जुनी प्रिस्क्रिप्शन्स. ऑनलाइन सल्ल्यासाठी यांचे फोटो WhatsApp वर आधी पाठवा.
पंचकर्मासाठी ॲडमिट व्हावे लागते का?
उपचाराच्या प्रकारावर अवलंबून आहे. अनेक उपचार ओपीडीमध्ये होतात. बस्तीसारख्या उपचारांसाठी ॲडमिट केल्यास नर्सिंग स्टाफ आहार व दिनचर्येवर लक्ष ठेवतो.
सध्याची इतर औषधे चालू ठेवावीत का?
डॉक्टरांशी बोलल्याशिवाय कोणतेही औषध स्वतःहून बंद करू नका. मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांची औषधे लक्षात घेऊनच उपचारांचे नियोजन केले जाते.
आयुर्वेदिक उपचार सुरक्षित आहेत का?
योग्य निदान, योग्य मात्रा आणि वैद्यकीय देखरेखीखाली घेतलेले उपचार सुरक्षित असतात. आपले इतर आजार, गर्भावस्था किंवा ॲलर्जी याची माहिती डॉक्टरांना नक्की द्या.
उपचारांना किती दिवस लागतात?
आजार, तो किती जुना आहे आणि त्याचा टप्पा यानुसार कालावधी बदलतो. पहिल्या सल्ल्यानंतर डॉक्टर अपेक्षित कालावधी व फॉलो-अपची योजना सांगतात.
आमच्याशी संपर्क साधा
अस्थी, सांधे व मणक्यांच्या तक्रारींसाठी सल्ला व अपॉइंटमेंट. फॉर्म भरल्यावर तो तयार संदेश म्हणून WhatsApp वर उघडतो.