हा त्रास काय आहे?
तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकणारी गुडघेदुखी 'जुनाट' मानली जाते. बहुतेक वेळा झीज, जुनी दुखापत, वजन आणि स्नायूंची कमजोरी अशी अनेक कारणे एकत्र असतात. केवळ वेदनाशामक गोळ्यांऐवजी मूळ कारणांवर काम करणे महत्त्वाचे ठरते.
सामान्य लक्षणे
- महिनोंमहिने कमी-जास्त होणारी वेदना
- हवामान बदलताना त्रास वाढणे
- चालण्याचे अंतर कमी होणे
- वेदनाशामक गोळ्यांवर अवलंबित्व
सामान्य कारणे
- सांध्यांची झीज
- जुनी दुखापत किंवा लिगामेंट/मेनिस्कसचा त्रास
- वाढलेले वजन
- स्नायूंची कमजोरी
आमच्याकडील उपचार
तपासणीनंतर डॉक्टर यांपैकी आपल्या गरजेनुसार उपचार निवडतात.
- 3RDT रिजनरेशन थेरपीरिजनरेशन थेरपीच्या संकल्पनेवर आधारित आमची विशेष उपचार प्रणाली. सांध्यांची स्थिती, आजाराची तीव्रता आणि वैद्यकीय तपासण्यांच्या आधारे नियोजन.
- जानुबस्तीगुडघ्याभोवती पिठाचे कुंपण करून त्यात कोमट औषधी तेल ठराविक वेळ धरून ठेवण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
- बस्ती चिकित्साअनुवासन (तेल) व निरूह (काढा) बस्ती; वाताच्या विकारांमध्ये प्रमुख उपचार.
- अग्निकर्मआयुर्वेदातील विशिष्ट तंत्रानुसार, प्रशिक्षित वैद्यकीय देखरेखीखाली निवडक वेदनाबिंदूंवर केली जाणारी उपचारपद्धती.
- औषधोपचारमेरुपोषक व मज्जास्नायू पोषक आयुर्वेदिक औषधे; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.
- पथ्य, व्यायाम व योगआहार, दिनचर्या, व्यायाम आणि योगासनांविषयी वैयक्तिक मार्गदर्शन.
उपयुक्त तपासण्या: उभे राहून X-ray; गरजेनुसार MRI व रक्त तपासण्या
ही लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
- अचानक वाढलेली सूज किंवा लालसरपणा
- रात्री विश्रांतीतही तीव्र वेदना
रोजची काळजी
- वेदनाशामक गोळ्या स्वतःहून दीर्घकाळ घेऊ नका
- रोज हलका व्यायाम व चालणे
- वजन नियंत्रणात ठेवा
ही माहिती जनजागृतीसाठी आहे; ती डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीला पर्याय नाही.