हा त्रास काय आहे?
मणक्यांच्या अनेक विकारांची लक्षणे सारखी दिसतात: पाठदुखी, ताठरपणा, पायात वेदना. योग्य निदान झाल्यावरच योग्य उपचार निवडता येतात. आमच्याकडे खालील विकारांची तपासणी व उपचार केले जातात.
आमच्याकडे उपचार होणारे प्रकार
- मणका सरकणे (Listhesis)
- मज्जारज्जूचे छिद्र अरुंद होणे (Stenosis)
- मणक्यांचे सांधे सुजणे (Facet arthropathy)
- माकडहाडाला सूज (Sacroiliitis)
- पाठीचा कणा बांबूसारखा कडक होणे (Ankylosing spondylitis)
- हाडे ठिसूळ होणे (Osteopenia, Osteoporosis)
सामान्य लक्षणे
- पाठ व कंबर जखडणे
- सकाळी ताठरपणा, हालचालीनंतर कमी होणे
- चालताना पाय भरून येणे, थांबावे लागणे
- पाठीच्या एकाच ठिकाणी ठणका
सामान्य कारणे
- वयानुसार झीज
- पोषणाचा व व्यायामाचा अभाव
- जुनी दुखापत
- कामाचे स्वरूप (जड काम, दीर्घ प्रवास)
आमच्याकडील उपचार
तपासणीनंतर डॉक्टर यांपैकी आपल्या गरजेनुसार उपचार निवडतात.
- बस्ती चिकित्साअनुवासन (तेल) व निरूह (काढा) बस्ती; वाताच्या विकारांमध्ये प्रमुख उपचार.
- कटिबस्तीकंबरेच्या भागात औषधी तेल विशिष्ट वेळेसाठी धारण करण्याची पारंपरिक उपचारपद्धती.
- ग्रीवाबस्ती व पृष्ठबस्तीमान व पाठीच्या भागावर औषधी तेल धारण करण्याचा उपचार.
- पंचकर्मवमन, विरेचन, बस्ती, नस्य व रक्तमोक्षण हे शोधन उपचार; प्रकृती, वय, बल आणि आजाराचे स्वरूप पाहून निवड.
- औषधोपचारमेरुपोषक व मज्जास्नायू पोषक आयुर्वेदिक औषधे; डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच.
- पथ्य, व्यायाम व योगआहार, दिनचर्या, व्यायाम आणि योगासनांविषयी वैयक्तिक मार्गदर्शन.
उपयुक्त तपासण्या: X-ray, MRI; हाडांच्या घनतेसाठी BMD; गरजेनुसार रक्त तपासण्या
ही लक्षणे असल्यास तातडीने डॉक्टरांकडे जा
- लघवी किंवा शौचावरील नियंत्रण जाणे
- पायात अचानक कमजोरी, पाय घोट्यापासून लटकणे
- ताप, वजन घटणे किंवा अपघातानंतर सुरू झालेली कंबरदुखी
रोजची काळजी
- डॉक्टरांच्या सल्ल्याने दरवर्षी तपासणी व आवश्यक उपचार
- कॅल्शियम व प्रथिनयुक्त आहार
- नियमित चालणे व योगासने
ही माहिती जनजागृतीसाठी आहे; ती डॉक्टरांच्या प्रत्यक्ष तपासणीला पर्याय नाही.